3.2 C
New York
Friday, January 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर सुनेने केले गंभीर आरोप..

प्रेमलता पारवे,संपादक मुजीब शेख यांनी धमकवल्याचा आरोप केल्याने खळबळ.बीड (प्रतिनिधी): बीड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांच्या सुनेने आज प्रसारमाध्यमां समोर येत कुटुंबातील वाद आणि मानसिक छळाबाबत गंभीर आरोप केले आहेत.

सुनबाईने भावनिक स्वरात केलेल्या विधानात सुनेने कुटुंबाकडून होत असलेल्या त्रासामुळे स्वतःला व मुलांना सुरक्षित नाही वाटत असल्याचा दावा केला आहे. तसेच काही महत्त्वाचे पुरावे स्वतःजवळ असल्याचे सांगत तिने न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

 

या आरोपांमुळे निवडणूक प्रचाराच्या मध्यावर पारवे परिवार आणि राष्ट्रवादी गटावर राजकीय दबाव वाढत आहे. या प्रकरणावर प्रेमलता पारवे व शेख मुजीब हे दोघे मिळून मला धमकावतात व मानसिक शारीरिक त्रास देतात, शेख हे पोलिसांना दबाव टाकून आमच्यावरच खोट्या केसेस करतात यामुळे आम्ही पूर्ण दहशतीखाली असून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे त्यांचा परिवार यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. पक्षातील काही कार्यकर्त्यांनी हे आरोप निवडणुकीतील राजकीय डावपेच असल्याचे म्हटले आहे.

 

घटनेची अधिक माहिती मिळत असून पोलीसही कागदपत्रांची तपासणी करत असल्याचे समजते. पुढील काही तासांत संबंधितांची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.मात्र पारवे यांच्या सुनेने प्रसारमाध्यमा समोर आरोप केल्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पारवे यांच्या सुनेने गंभीर आरोप करत आम्हाला न्याय द्यावा व माझ्या मुलाला परत द्यावे अशी मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या