13 C
New York
Thursday, October 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

बीड मध्ये माजी मॅनेजरचा मालकावर ब्लॅकमेल, धमकी आणि हिंसाचाराचा सिलसिला?

बीड मध्ये माजी मॅनेजरचा मालकावर ब्लॅकमेल, धमकी आणि हिंसाचाराचा सिलसिला?

 

गणेश गोरे यांनी पुराव्यासह सोशल मीडियावर उघड केले आरोप?

 

बीड, दि. २३ ऑक्टोबर २०२५: बीड शहरातील एका व्यावसायिकावर माजी कर्मचाऱ्याने ब्लॅकमेल, धमकी आणि हिंसाचाराचा सिलसिला चालू केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पुराव्यासह सोशल मीडियावर व्हिडिओ आणि पोस्ट टाकून तक्रारदाराने हे प्रकरण उघड केले असून, पोलिसांकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी आणि ३०७ (हत्या करण्याचा प्रयत्न) कलमाची भीती निर्माण झाली असल्याने स्थानिक ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची आली आहे.तक्रारदार गणेश गोरे हे बीड येथे हाॅटेल व्यवसाय चालवतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, बाबू बजरंग तावरे नावाच्या व्यक्तीने २०१९ ते २०२२ पर्यंत त्यांच्या हाॅटेल वर झाडू-पोचा करायचे काम केले. नंतर गोरे यांनी त्याला विश्वास ठेवून बीड मधील ऑफिसमध्ये मॅनेजर म्हणून नेमले, जिथे त्याने २०२२ ते २०२४ पर्यंत चांगले काम केले. मात्र, या कालावधीत तावरेने व्यसनाधीनता वाढवली आणि कामाच्या ठिकाणी अनुचित वर्तन केल्याने गोरे यांनी त्याला नोकरीवरून काढून टाकले.नोकरी गेल्यानंतर तावरेने राग धरला आणि गोरे यांच्यावर ब्लॅकमेल सुरू केले. तक्रारदाराने सांगितल्याप्रमाणे, तावरेने “विकलेल्या जमिनीचे कागदपत्रे सोडवण्यासाठी पैसे मागितले. मी नकार दिल्यावर तो म्हणाला, ‘तू माझ्याच जिवावर पैसे वाला झालायस.’ यानंतर त्याने अनेक प्रकारे हिंसा आणि धमक्या दिल्या.” या प्रकरणातील प्रमुख घटना अशा आहेत:१. मोटारसायकलला आग: काही दिवसांपूर्वी तावरेने गोरे यांची मोटारसायकल गावातील बस स्थानकाजवळ पेट्रोल ओतून भरदिवसा जाळली. ३०७ कलमाची खोटी तक्रार: त्याच काळात तावरेने गोरे यांच्यावर हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा (IPC कलम ३०७) खोटा गुन्हा दाखल केला. गोरे यांना कसाबसा या प्रकरणातून निर्दोष मुक्ती मिळाली. हॉटेलवर हल्ला आणि व्हिडिओ: नुकतेच तावरेने गोरे यांच्या हॉटेलवर धाव घेतली आणि नाट्यमयरीतीने वागत बदनामीचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून, त्यात तावरेने स्वतःवर पेट्रोल ओतले असल्याचे दिसते. मात्र, तक्रारदाराचा आरोप आहे की, हे सर्व ब्लॅकमेलचे साधन आहे. व्हिडिओमध्ये तावरे गोरे यांना म्हणतो, “मी तुझ्यावर खोटी केस करणार आणि माझ्यावर पेट्रोल ओतले म्हणून ३०७ कलमही दाखल करणार.”गोरे यांनी सांगितले, “मी त्याला नेहमीच मदत केली, पण व्यसनामुळे आणि रागामुळे त्याने हे सर्व सुरू केले. आता मी आणि माझे कुटुंब धोक्यात आहे. सोशल मीडियावर सर्व पुरावे मी टाकले आहेत, ज्यात व्हिडिओ आणि पोस्ट आहेत. पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होत असून, व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, “तक्रार नोंदवण्यात आली असून, पुराव्यांच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास केला जाईल. ब्लॅकमेल आणि धमकीचे आरोप गंभीर आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या