12.2 C
New York
Wednesday, March 12, 2025

Buy now

spot_img
spot_img

महादेव तांडा येथील सेल रिपाॅवर प्रायव्हेट लिमिटेड सोलार कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक!

◼️भाडेपत्रावर जमीन घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक; कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे 

◼️शेतकऱ्यांचा आमरण उपोषण सुरू; उपोषणाचा आजचा पहिला दिवस 

◼️जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन न्याय द्यावा; उपोषणकर्तोंची मागणी! 

महाराष्ट्र आरंभ वृत्त, (नवनाथ आडे) : गेवराई तालुक्यातील देवपिंपरी व कोमलवाडी शिवारातील महादेव तांडा येथे सेल रिपाॅवर प्रायव्हेट लिमिटेड सोलार कंपनी स्थापन होत असून, कंपनी स्थापन करण्यासाठी कंपनीने शेतकऱ्यांकडून जमिनीचे भाडेपत्रा करून प्रत्येकाचे पाच ते सहा एकर जमीन ३० वर्षाच्या भाडेपट्ट्यावर घेतलेली असून, वर्षाला ८० हजार एकर प्रमाणे देण्याचे ठरलेले असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. तसेच दोन वर्षाचे ८० हजार प्रमाणे दिले. व बाकीचे बॉन्ड करून देऊ असे कंपनीकडून आश्वासन दिले होते. परंतु आता भाडेपत्रावर जमीन दिलेल्या शेतकऱ्यांचा कंपनीने बंद केलेला आहे. यामुळे सदरील शेतकरी आज वार मंगळवार दि.११ फेब्रुवारी २०२५ रोजी पासून सेल रिपाॅवर प्रायव्हेट लिमिटेड सोलर कंपनीच्या विरोधात बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेवराई तालुक्यातील महादेव तांडा येथे सेल रिपाॅवर प्रायव्हेट लिमिटेड सोलार कंपनी स्थापन होत आहे. यासाठी या कंपनीचे अधिकारी शेख अफसर जब्रदिन यांनी त्याठिकाणी जाऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा करून या कंपनीसाठी त्याठिकाणी राहणाऱ्या रविंद्र शिवाजी पवार, ज्ञानेश्वर सुखदेव जाधव, अविनाश अंबादास जाधव, रामनाथ गणपत जाधव, गणेश प्रल्हाद जाधव, अशोक अंबादास जाधव, अनिता रामनाथ जाधव, अभिजित रामनाथ जाधव, अंबादास शेकु पवार या शेतकऱ्यांची जमीन भाडेपत्रावर करून घेतली होती. परंतु भाडे पत्रावर जमीन दिलेल्या शेतकऱ्यांचा हप्ता कंपनीने बंद केल्याने कंपनीने शेतकऱ्याची फसवणूक केली असल्याचे शेतकऱ्याकडून सांगण्यात येत आहे. याप्रकरणी सदरील कंपनीचे अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी जॉब विचारला असता, तुम्हाला काय करायचे ते करा माझ्या हातामध्ये काही नाही तुम्ही कायद्याने काय करायचे ते करा असे सांगत धमकावले जात असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. तसेच या शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीला वारंवार विनंती करूनही कंपनी टाळाटाळ करत असून उडवाउडवीची उत्तरे देत आहे. तसेच संबंधित कंपनीचे त्या ठिकाणी ऑफिस असून शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेतल्यास आमच्याकडे काही नाही तुम्ही कंपनीकडे तक्रार करा असे म्हणत तुम्ही उपोषणाला बसलात तर आमचे कंपनीचे कर्मचारी व कंपनीचे काही गुंड लोक तुमचे हात पाय तोडतीत अशी धमकी सदरील शेतकऱ्यांना देत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यामुळे सेल रिपाॅवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विरोधात सदरील शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाचा आजचा पहिला दिवस असून याकडे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी गांभीर्याने लक्ष देऊन न्याय द्यावा अशी मागणी उपोषणकर्तांनी केली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या