बीडच्या पोलिस अधिक्षक पदी (SP) नवनीत कॉवत यांची नियुक्ती.
माजलगाव प्रतिनिधी
बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
बीड जिल्ह्यामध्ये सध्या अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली असून बीड जिल्हा नेहमीच चर्चेत असतो तसेच खुलेआम किडनॅपिंग, खून , खंडणी, वाळू तस्करी अशा अनेक गुन्हेगारी मध्ये वाढ होताना दिसत आहे त्यामुळे बीडच्या पोलीस अधीक्षक बारगळ साहेब यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते तसेच मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले असून यामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते यामुळे त्यांची बदली करून बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी नवनीत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.