राज्यमंत्रिपदाचा अनुभव असणाऱ्या आ. प्रकाशदादा सोळंके यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा.
सभापती नरवडे उपसभापती मोरे यांची पक्षश्रेष्ठीकडे मागणी.
माजलगाव सुनिल थोरात :
माजलगाव मतदारसंघाचा विकास आ. प्रकाश सोळंके यांनीच केला आहे. आणि विकासाचा जो बॅकलॉग राहिला आहे. तो पूर्ण करण्याची धमक ही आ. प्रकाशदादा सोळंके यांचीच आहे. त्यामुळे विकास पुरुष असणाऱ्या व राज्य मंत्रिपदाचा अनुभव असणाऱ्या प्रकाशदादांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करण्याची मागणी बाजार समितीचे सभापती जयदत्तआण्णा नरवडे व उपसभापती श्रीहरीनाना मोरे यांनी पक्षश्रेष्टीकडे केली आहे.
माजलगाव मतदार संघात विकासाची मुहूर्तमेढ माजी उपमुख्यमंत्री
सुंदरराव सोळंके यांनी रोवली आहे. तोच आदर्श आ. प्रकाश सोळंके यांनी मतदारसंघात सुरू करून विकासाची मतदारस गंगा या ठिकाणी ओडून आणली आहे. राज्यमंत्रीपदाच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी मतदार संघाचा कायापालट केला आहे. मंत्री पदाचा त्यांना अनुभव आहे. मतदारसंघात जो विकास झाला आहे, तो आ. प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील मतदारांनी आ. प्रकाश सोळंके यांना पाचव्यांदा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे. मागील तीस वर्षांमध्ये आ. प्रकाश सोळंके यांनी मोठ्या
प्रमाणात विवीध विकासकामे केली आहेत. विद्यार्थ्यांचे, सुशिक्षित बेरोजगारांचे. त्याचप्रमाणे
जलसिंचनाचे, अनेक प्रश्न मार्गी लावल्याने बहुतांशी शेतकरी आज समृध्द झाला आहे. विकासाचे अनेक कामे झाली आहेत. उर्वरित विकासाचा जो बॅकलॉग भरून काढायचा आहे, तोही आ.प्रकाश सोळंकेच काढू शकतात. विकासाची दूरदृष्टी त्यांच्याकडे आहे. मंत्री पदाचा अनुभवही त्यांच्याकडे आहे त्यामुळे आ. प्रकाशदादा सोळंके यांना मंत्रिमंडळात समावेश करण्याची मागणी बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे व उपसभापती श्रीहरी मोरे यांनी शिष्टमंडळाद्वारे पक्षश्रेष्ठीकडे केली आहे.