4.7 C
New York
Friday, November 29, 2024

Buy now

spot_img
spot_img

केज मतदारसंघात डाॅ. महावीर धर्मराज सोनवणे यांच्या रोड रोलरला मतदारांची पसंदी

केज, महाराष्ट्र आरंभ वृत्त : तालुक्यातील मस्साजोगचे भूमिपुत्र डॉ. महावीर धर्मराज सोनवणे यांच्या रोड रोलरला दिवसांनी दिवस केज मतदार संघात मतदारांची पसंती मिळत आहे. डॉ. महावीर सोनवणे यांनी प्रचारामध्ये भरारी घेतली आहे. केज विधानसभेची निवडणूक ही तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. केज विधानसभेच्या निवडणुकीत डॉ. महावीर सोनवणे यांचाच विजय होणार आहे असे माध्यमाशी बोलताना संस्थेचे अध्यक्ष मा.रमेश भाऊ सोनवणे यांनी म्हटले आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, २०२४ च्या केज विधान सभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे या निवडणुकीमध्ये प्रमुख पक्षाच्या उमेदवारासह २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. केज विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये अपक्ष तथा मित्र पक्ष, व विविध सामाजिक संघटनेचे, फुले शाहू आंबेडकर चळवळीतील बौद्ध उमेदवार डॉ.महावीर धर्मराज सोनवणे हे देखील आहेत. विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात असून प्रमुख पक्षाच्या उमेदवारासह डॉ. महावीर सोनवणे यांनी देखील प्रचारांमध्ये आघाडी घेतली असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. सोनवणे यांना केज मतदार संघातील मतदाराकडून दिवसांनी दिवस पसंती मिळत असल्याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. डॉ. महावीर सोनवणे हे त्यांच्या कार्यकर्ते व मित्र परिवारासह सर्व संघटनेतील पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन मतदार संघातील गावोगावात जाऊन

मतदारांशी संवाद साधून गाठीभेटी घेत आहेत. विद्यार्थी महिला शेतकरी युवक नागरिक यांच्या समस्या जाणून घेत आहेत त्यामुळे सोनवणे यांना मतदारांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. डॉ. महावीर सोनवणे यांच्या खांद्याला खांदा लावून मा.रमेश भाऊ सोनवणे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरून डॉ. महावीर सोनवणे यांच्या प्रचाराची रात्र दिवस काम करत आहेत. माध्यमाशी बोलताना म्हणाले की, केज मतदार संघ हा अनुसूचित जाती या प्रवर्गाला गेल्या अनेक वर्षांपासून राखीव आहे परंतु या मतदारसंघांमध्ये कोणत्याच राजकीय पक्षांनी दलित उमेदवार दिलेला नाही. डॉ. महावीर सोनवणे हे दलित समाजाचे व समाजाचे काम करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे या मतदारसंघाचे भूमिपुत्र आहेत डॉ.सोनवणे यांना डावी आघाडीसह दलित

चळवळीतील विविध संघटनेने पाठिंबा दर्शविलेला आहे व सर्व एकदिलाने एकजुटीने डॉ. महावीर सोनवणे यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभा आहोत. पुढे बोलताना रमेश भाऊ म्हणाले की. डॉ. महावीर सोनवणे यांची ही निवडणूक नसून या मतदारसंघातील बहुजनाची लढाई आहे या लढाईमध्ये सर्व बहुजन समाज एकत्र होऊन ही निवडणूक लढवीत आहे म्हणून महावीर सोनवणे यांना दि.20 तारखेला रोड रोलर या चिन्ह समोरल बटन दाबुन प्रचंड बहुमताने विजय करा आणि हा निश्चित आहे येणाऱ्या २३ नोव्हेंबर रोजी त्यांनाच गुलाल लागणार आहे असे मध्यमाशी बोलताना कै.बन्सीलाल एकनाथराव सोनवणे युवा क्रीडा मंडळ व व्यायाम शाळेच्ये संस्थेचे अध्यक्ष मा.रमेश भाऊ यांनी स्पष्ट केले आहे. डॉ.महावीर सोनवणे यांनी प्रचारामध्ये भरारी घेतली असून व त्यांना केज अंबाजोगाई मतदार संघामध्ये संस्थेचे सर्व सदस्य विक्रम सर शिंदे, सुरेंद्र शिंदे, अजिंक्य सोनवणे,प्रमोद सोनवणे,रोहित शिंदे,मोगली कांबळे,आदित्य इंगळे,येशपाल इंगळे,काम करत आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या