वीस वर्षात बीड मतदारसंघातील रस्ते नाल्या, आरोग्य या विषयाचा विकास,
बीड (प्रतिनिधी) शहरातील वाढत चाललेली ट्रॅफिक ची समस्या. पोलीस प्रशासना सह पुढार्यांच्या दुर्लक्ष.? बीड शहरातील अरुंद रस्ते, आणी नियम मायबाप जनतेच्या पदरी पाडुन मिळालेला नाहक त्रास.गेल्या वीस वर्षात आरोग्यासाठी, जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या विषयांचे असंख्य प्रश्न, आणी वीस वर्ष मतदारसंघाचा विकास रोखुन जनतेला या नाग त्रासातून मुक्त करण्यासाठी नितीन सोनवणे वेळोवेळी पुढे आले आहेत.जो पर्यंत आलिशान महालातील सोन्याच्या ताटात खाणाऱ्या; आणि गरीब जनतेला विकासापासून दूर ठेवणाऱ्या पुढार्यांनी, गोरगरिबांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी काय केल. कधी त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरले का असा प्रश्न वेळोवेळी नितीन सोनवणे यांनी प्रश्न उपस्थित केले व जनहितार्थ समोर आले. त्यामुळे त्यांची बीड मध्ये ज्यास्त पसंती मिळत आहे.
त्यांनी ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी, ऊसतोड मजुरांचा वनवास संपवण्यासाठी वेळोवेळी आवाज उठवला. ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांना; त्यांच्या मूलभूत हक्कासाठी शेतकऱ्यांसाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते पुढे आले. मात्र निवडणुकीच्या काळात धनशक्तीच्या माध्यमातून धनशक्तीच्या जोरावर स्वतः आपली स्वार्थी भूमिका घेऊन गावोगावी दारोदारी मोठ्या तोरात मिरवत असणाऱ्यांना मायबाप जनता यावेळी ओळखून आहे. त्यामुळे जनसामान्यातुन संघर्ष करून उद्यास आलेला गरीबा शेतकर्याचे लेकरू मायबाप जनतेच्या लोकाभिमुख मुद्दाना सोडवण्यासाठी. आणि विकास होणाऱ्या मुद्द्यावर घाव घालण्यासाठी हा पॅंथर नितीन सोनवणे मैदानात उतरला आहे.
सामान्यांच्या विचारांच्या न्याय हक्का साठी मोठा लढा उभारुन प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित ऊसतोड कामगारांचा मुलगा मैदानात यावेळी उतरला आहे. यासाठी सुजान नागरिकांनो जनतेसाठी रोडवर उतरून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा खमक्या हा पॅंथर पट्ट्या लोकाभिमुख मुद्दे घेऊन जनसेवेसाठी मैदानात उतरला आहे. हीच ती वेळ आहे मतदान संघातील जनतेला वीस वर्षाच्या वनवासातून मुक्त होण्याची. त्यामुळे बीड मधून नव चेहरा म्हणून पॅंथ नितीन सोनवणे चे नाव सध्या जोरदार चर्चेत असल्याचे व त्यांना जास्त पसंती मिळत असल्याची जोरदार चर्चा बीड मध्ये होत असल्याचे समजते आहे.