◼️एकदम साध्या पध्दतीने आ.लक्ष्मण पवारांनी भरला आपला उमेदवारी अर्ज
गेवराई महाराष्ट्र आरंभ वृत्त : गेल्या दहा वर्षां पुर्वी मतदारसंघात असलेली परिस्थिती व आज मतदार संघात झालेला बदल जनतेला माहीत आहे पुर्वी गोरगरीब रेशनकार्ड धारकास राशन मिळत नव्हते पण आमदार म्हणून गेवराई तालुक्यातील राशन वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करीत बायोमेट्रिक प्रणाली सुरु करुन गोरगरीबांना हाक्काचे राशन मिळवुन देण्यासाठी केलेले प्रमाणिक प्रयत्न जनता कधीच विसरणार नाही असा मला विश्वास आसल्याचे आ.लक्ष्मण पवार यांनी म्हटले आहे मतदारसंघातील लोकप्रिय आमदार लक्ष्मण माधवराव पवार यांनी आज दि.28 ऑक्टोबर रोजी एकदम साध्या पध्दतीने आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शिवराज पवार जे.डी. शहा, राहुल खंडागळे,शिनुभाऊ बेद्रे,धम्मपाल सौदरमल, जमील सेठ, काशिनाथ पवार, आदीच्या उपस्थितीत आ.लक्ष्मण पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे
गेवराई मतदारसंघातील जनतेने मला दोन वेळेस सेवा करण्याची संधी दिलेली आहे या दहा वर्षात प्रमाणीक पारदर्शक दर्जेदार केलेला विकासावर मतदारसंघातील जनता विश्वास व्यक्त करील असा मला विश्वास आसल्याचे आ.लक्ष्मण पवार म्हणाले आहेत. पुढे बोलतांना ते म्हणाले की, मतदारसंघातील जनतेने दिलेल्या दहा वर्षांत रस्ते,जलसिंचनासाठी अनेक बंधारे बांधण्यात आले, वीज वितरण करण्यासाठी अनेक ठिकाणी 33 के व्ही केंद्र उभारून मतदारसंघातील विजेचा प्रश्न मार्गी लावला आहे, असे प्रश्न मार्गी लावले आहेत तर अनेक गावांत विकासाचे स्तोत्र सुरु आहे तो असाच सुरु ठेवण्यासाठी मतदारसंघातील माय जनतेने मला आशीर्वाद द्यावा असे आव्हान आ.लक्ष्मण पवार यांनी मतदारांना केले आहे यावेळी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती