बैठकीत शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी केले निर्णयाचे स्वागत
जिल्ह्या सह महाराष्ट्रतील शिवसंग्राम डॉ. ज्योतीताई यांच्या पाठीशी – प्रभाकर कोलंगडे
शिवसंग्राम एकसंघ डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या सोबत – नारायणराव काशीद
बीड (प्रतिनिधी)नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत दी.२० ऑक्टोबर रोजी मुंबईत शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी प्रवेश केला याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे ,राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते- पाटील, खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, आ. शशिकांत शिंदे उपस्थित होते. या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा शिवसंग्रामच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली. या बैतकित सर्वानुमते शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आणि संपूर्ण बीड जिल्हा शिवसंग्राम खंबीर पने डॉ. मेटे यांच्या पाठीशी उभी राहिल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. तसेच या प्रवेशाचे उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी देखील स्वागत केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडी वेग घेत असून काल आपल्या नेत्या डॉ. ज्योतीताई मेटे यांनी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. आज त्याच अनुषंगाने बीड जिल्हा शिवसंग्राम कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी बोलवण्यात आली आहे. या ठिकाणी उपस्थित
सर्वांनीच ताईंच्या या निर्णयाचे स्वागत केले असून मी ठामपणे डॉ. ज्योतीताई मेटे यांना विश्वास देतो की बीड जिल्ह्यासह राज्याची शिवसंग्राम ठामपणे आपल्या पाठीशी उभी आहे. असे मत यावेळी शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी व्यक्त केले.तसेच या बैठकीत उपस्थिताशी संवाद साधताना शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद यांनी पुढील वाटचाल आणि संघटना बांधणीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करत शिवसंग्राम एकसंघ डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या सोबत असल्याचा विश्वास दिला.
या प्रसंगी शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, प्रदेश सरचिटणीस नितीन लाठकर, जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, शहर अध्यक्ष सुहास पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रामदास नाईकवाडे, बीड विधानसभा प्रमुख प्रा.सुभाष जाधव, मा.पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर कोकाटे, बीड तालुका अध्यक्ष नवनाथ प्रभाळे, गेवराई तालुका अध्यक्ष कैलास माने, आष्टी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी,अंबेजोगाई तालुका अध्यक्ष धनेश गोरे,शिरूर तालुका अध्यक्ष माऊली शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मनीषा कुपकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पंडित माने, सचिन कळकुटे, मजूर सहकारी संस्थेचे संचालक बाळासाहेब हावळे, खरेदी विक्री संघाचे संचालक गोपीनाथ घुमरे, मा. नगरसेवक दत्ता गायकवाड यांच्या सह सर्व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष , सरपंच , ग्रामपंचायत सदस्य सह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.