23.4 C
New York
Monday, September 16, 2024

Buy now

spot_img
spot_img

बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बदली

🔸अविनाश बारगळ हे बीड जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक

बीड, महाराष्ट्र आरंभ : बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदावर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे कार्यरत होते. त्याचा बीड जिल्ह्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या जागी बीड पोलीस अधीक्षक म्हणून अमरावती येथील पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची अमरावती कारकीर्द राज्यात चर्चेत राहणारी ठरलेली होती. नंदकुमार ठाकूर यांची बदली झाली असली तरी, त्यांना नवीन ठिकाणी अजून नियुक्ती मिळालेली नाही. नंदकुमार ठाकूर यांनी दोन वर्ष सेवा बजावल्यानंतर त्यांचा कार्यकाळ सकारात्मक ठरला आहे. त्यांच्या जागी अविनाश बारगड बीडच्या पोलीस अधीक्षक पदावर येत आहेत. अविनाश बारगळ यांनी अमरावतीमध्ये चार वेळा पोलीस विभागात सेवा बजावली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक, त्यानंतर पोलीस उपायुक्त, म्हणून अमरावती शहरात त्यांनी कार्यकाळ झाल्यानंतर, अमरावती पोलीस अधीक्षक आणि नंतर पुन्हा अमरावतीमध्येच सीआयडीचे अध्यक्ष म्हणून गृह विभागाने त्यांना काम करण्याची संधी दिली होती. एकाच शहरात चार वेळा पोलीस दलात वेगवेगळे पदावर काम करणारे अधिकारी म्हणून, अविनाश बारगळ यांची राज्यात मोठी चर्चा झाली होती. आता ते अमरावतीच्या सीआयडी विभागातून बीडला पोलीस अधीक्षक म्हणून येत आहेत. एक चांगला आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या