23.4 C
New York
Monday, September 16, 2024

Buy now

spot_img
spot_img

सिरसदेवीतील रेशन दुकान क्रमांक 02 चा परवाना कायमस्वरूपी रद्द करा – पत्रकार शाम अडागळे

◼️जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे मागणी 

सिरसदेवी, महाराष्ट्र आरंभ प्रतिनिधी : गेवराई तालुक्यातील सिरसदेवी गावातील रेशन दुकान क्रमांक दोन चे मालक शोभा सुधाकर वक्ते यांनी पत्रकार शाम अडागळे आणि त्यांची आई शांताबाई अडागळे व इतर एक जणांचे कार्ड अडागळे यांना न विचारता परस्पर गेवराई तहसीलदार यांना अर्ज देऊन दुसऱ्या दुकानाला शोभा वक्ते यांनी अधीकार नसताना जोडले आहे. याप्रकरणी पत्रकार शाम अडागळे यांनी दि. 05/08/2024 रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी बीड यांना तक्रार अर्ज देऊन वक्ते यांच्या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सविस्तर माहिती अशी कि, रेशन दुकानदार यांना परस्पर लाभार्त्यांचे कार्ड जोडण्याचा अधीकार नसताना शोभा वक्ते यांनी गेवराई तहसीलदार यांना अर्ज करून शाम अडागळे यांना न विचारता तसेच माहिती न देता कार्ड दुसऱ्या दुकानाला जोडण्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे शाम अडागळे यांनी थेट जिल्हा पुरवठा अधिकारी बीड यांना तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जात म्हटले आहे कि सिरसदेवी येतील दुकान क्रमांक दोनचे चालक शोभा सुधाकर वक्ते यांनी पूनम शाम अडागळे, शांताबाई नागूराव अडागळे, विद्या पिनू अडागळे या कार्ड धारकांचे कार्ड परस्पर माहिती न देता दुसऱ्या दुकानाला जोडण्याचे काम केले आहे.यामुळे मा जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या प्रकरणात लक्ष घालून या रेशन दुकानदारावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करून दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा अशी मागणी पत्रकार शाम अडागळे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या