◾सासरच्यांनी विष पाजून हत्या केली असल्याचा सुनेच्या नातेवाईकांकडून आरोप!
🔶गेवराई तालुक्यातील जोडवाडी येथील खळबळजनक घटना
गेवराई (महाराष्ट्र आरंभ) : सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. ही घटना (दि.१४ जुलै) रोजी रात्री गेवराई तालुक्यातील जोडवाडी येथे घडली आहे. या घटनेनंतर मयत महिलेच्या सासूचा ही मृत्यू झाला आहे. प्रतिक्षा संदीप कोकाटे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. व कौंताबाई कोकाटे असे मृत्यू झालेल्या सासुचे नाव आहे. या दोन्ही घटनेने गेवराई तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. मयत सासूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मादळमोही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणण्यात आला होता. याप्रकरणी मयत सुनेच्या भावाकडून चकलांबा पोलिसांत तक्रार दिली आहे.
प्रतीक्षा संदीप कोकाटे या महिलेचे गेल्या काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांनी सासरच्या मंडळीकडून तिचा छळ होऊ लागला. तसेच काल तिला सासरच्यांनी विष पाजून हत्या केली असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालय मध्ये आणण्यात आला होता. तसेच या घटनेनंतर प्रतीक्षा कोकाटेंची सासू कौंताबाई कोकाटे हिचाही मृत्यू झाला आहे. या मृत्यू बाबात वेगवेगळे तर्क विर्तक लावले असले तरी कौंताबाई कोकाटे यांचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास चालू आहे. चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करून कौंताबाई कोकाटे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मादळमोही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला होता. सुनेच्या आत्महत्या नंतर सासूचा मृत्यू झाल्याने गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सासरच्या लोकांनी विष पाजून हत्या केली असल्याचे याप्रकरणी मयत सुनेच्या भावाकडून चकलांबा पोलिसांत तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे