◼️करूणाताई मुंडे यांना ग्रामीण भागातील मतदारांचा वाढता पाठिंबा
गेवराई प्रतिनिधी,(नवनाथ आडे):- बीड लोकसभा निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून आहे. सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यात स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांनी बीड लोकसभेची उमेदवारी घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने बीड जिल्ह्यातील मतदारांचा उत्साह वाढला असून बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मतदारांचा करुणाताई धनंजय मुंडे यांना वाढता पाठिंबा मिळू लागला आहे.
बीड लोकसभेच्या निवडणुकीत स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांनी गेल्या दोन वर्षापासून बीड जिल्ह्यातील अनेक गावात जाऊन अनेक लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांनी त्या सोडविल्याही आहेत. म्हणून त्यांनी या ग्रामीण व शहरी मतदारांच्या विश्वासावर आपली उमेदवारी दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने बीड जिल्ह्यातील मतदारांचा उत्साह वाढला असून मतदार करूणा मुंडे यांच्या प्रचारालाही लागले असल्याने बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मतदारांचा करुणाताई धनंजय मुंडे यांना वाढता प्रतिसाद मिळू लागला आहे