27.5 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

खालापूरी येथील सरपंचाचा विकास अजून पोस्टापर्यंत पोहचलाच नाही-डॉ.जितीन वंजारे

खालापूरी येथील सरपंचाचा विकास अजून पोस्टापर्यंत पोहचलाच नाही-डॉ.जितीन वंजारे
मनमानी कारभार करून दिलेले गाळे खाली करा आणि पोस्ट ऑफिस ला तत्काळ चांगली जागा द्या.नसता खलापूरीतील दारूची दुकाने,टपऱ्या हटवून तिथे शासकीय कार्यालयांना जागा द्या. डॉ. जितीन वंजारे

बीड प्रतिनिधी :-खालापूरी येथील शासकीय कामाचा निधी,शासकीय कार्यालय निधी, सभागृह निधी, ग्राम पंचायत गाळ्यांचे करार भाडे,अग्रिम मुद्दल, बाजाराचे जमा केलेले बजेट जात कुठ?गाळ्यांचे भाडे पत्रक त्यांचा केलेला लिलाव ,घेतलेली अग्रिम मुद्दल तसेच प्रॉपर्टी कर, नळ पट्टी, घर पट्टी,विद्युत पट्टी,इतर जमा केलेला निधी यांचा हिशोब सरपंच, ग्राम सेवक,यांनी द्यावा नसता मा.कलेक्टर साहेबाना त्याच निवेदन देऊन झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल माहिती समोर आणली जाईल.स्वतःच्या नातेवाईकांना बेजबाबदारपणे दिलेले गाळे,त्याचा लिलाव न करता स्वतःच्या मालकीच्या जागा असल्यागत फुकट लाटलेल्या ग्रामपंचायत च्या जागा,सार्वजनिक समाजाच्या हडप केलेल्या जागा यांची बेजबाबदारपणे केलेली अनागोंदी कारभार लवकर बाहेर काढा.सर्व धर्म समभाव म्हणून सर्वांना जागा गाळे द्या नसता सर्वांनी गाळे खाली करा असा इशारा डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला*
*खालापूरी येथील सर्व ग्रामपंचायत गळ्याचे भाडे जाते कुठे? त्यांची डागडुजी करण्याची जबाबदारी कोणाची ? गाळा पकडण्या मध्ये फक्त एकाच जातीची मक्तेदारी का?इतर लोकांना ग्रामपंचायत गाळे का धरून दिले जात नाहीत? त्यांचे भाडे करार कुठे आहेत?त्यांतून येणारे उत्पन्न,बाजार दिवशी येणारे उत्पन्न?अतिरिक्त ग्रामसेवकांनी जमा केलेला निधी कसा व कुठे वापरला जातो? याच विवरण ग्राम सभेमध्ये सर्व गावकर्यांसमोर मांडलं का जात नाही?.शासकीय कार्यालयाला योग्य जागा देणं ही ग्राम पंचायतेची, गावकऱ्यांची जबाबदारी असली पाहिजे.कोणीतरी स्वतःची जागा शासकीय इमारतीला देत आणि स्वतःचा कापूस ,भुसार माल,भंगार सामान,पत्ते खेळण्यासाठी चां क्लब म्हणून शासकिय इमारती वापरल्या जातात,जस की ते शासनाचे जावई आहेत आणि ती त्यांनाच बिल्डिंग बांधून दिली आहे अगदी तसच लोक शासकीय कार्यालय वापरतात.त्यामुळे ग्रामपंचायत ने स्वतःची जमीन स्वतःच्या उत्पन्नासाठी वापरली पाहिजे.शासकीय बँकेचे कर्ज उचलून कमर्शिअल गाळे ,बिल्डिंग आणि बाजार वठे तयार करून त्याच भाड जमा केलं पाहिजे ,त्या जागेचा, गाळ्याचा जाहीर लिलाव करून जो ही डीपॉझीट देईल त्यालाच गाळा किंवा जागा द्यायला पाहिजे. खालापूरी ग्रामपंचायत ने दिलेले गाळे सर्रास दारू,मद्य,पत्याचे क्लब, तंबाखू ,गुटखा विकण्यासाठीच्या टपऱ्या इत्यादी सारख्या दोन नंबर धंद्यासाठीच वापरलेले जातात त्यामुळे गावात बेवडे,पेताड,संसार मोडणारे लोक,जुगारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे व्यक्ती वाढत आहेत.ज्यांचा गावात त्रास वाढत आहे,जे की गावात ग्राम पंचायत ला योग्य निधी न देताच गाळे हडप करतात हे सर्व अतिक्रमण हटाव मोहिम सरपंच,सदस्य, ग्रामसेवक कधी हातात घेणार? दारूमुळे, पत्त्त्याच्या क्लब मुळे जुगारी मुळे गरिबांची संसार उध्वस्त होण्याची वाट पाहणार की काय ? वेळीच योग्य पाऊल उचला नसता कायदेशीर कार्यवाही ला सामोरे जावे लागणार असा इशारा या निवेदना मार्फत सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी सरपंच,सदस्य आणि ग्रामपंचायत खालापूरी यांना दिला आहे.
काल एका कामानिमित्त माझे मित्र धनंजय परजने हे पोस्ट ऑफिस मध्ये गेले असता त्यांना पोस्टाचे ऑफिस पहावले नाही त्यांनी जीर्ण झालेल्या,गळक्या पोस्ट ऑफिस रूम चे फोटो काढले आणि त्यावर आपले मत व्यक्त केले त्या सामान्य माणसाला जे कळलं की या पोस्ट ऑफिस ला जागा नसल्यामुळे त्यांची डागडुजी केली पाहिजे जे ह्या सत्तेवर बसणाऱ्या एकही सदस्य सरपंच किंवा ग्राम सेवक याला कळू नये इतके हे कमी बुद्धीचे आहेत काय ? थोडक्यात आपल्या गावात एखादे ऑफिस आले तर त्यांना निवारा योग्य जागा इमारत बांधकाम देणे ही आपली नैतिक जबाबदारी नाही काय ? जसं तलाठी कार्यालय,ग्राम पंचायत कार्यालय, बँक इत्यादी ला जागा दिली तशी पोस्ट ऑफिस ला जागा का नाही दिली असा सवाल डॉ जितीन वंजारे यांनी उचलला.गावात पत्त्याची क्लब ची संख्या वाढत आहे स्वतःच्या नातेवाईकांना क्लब टाकून देऊन,कोणाला तंबाखू, गुटख्याच्या टपऱ्या,कोणाला दारू मद्य विक्रीसाठी स्टॉल टाकून देऊन इथलेच नेते एक प्रकारे गावाला व्यसनाधीन बनवू पाहत आहेत.त्यामुळे गावात बेवडे आणि पेताड व जुगारी लोकांची संख्या वाढत आहेत त्यामुळे घरोघरी भांडणे निर्माण होऊन हेच पुढारी तिथे चमचा म्हणून मध्ये मध्ये करत आहेत कोणाची बांधावरून तर कोणाची दारूवरून भांडणे लावून परत सोडवण्याचा श्रेय घेऊन स्वताचीच पाठ थोपटून घेत आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे .गावात दारूबंदी झाली पाहिजे,जुगार बंदी झाली पाहिजे ,गावात लायब्ररी हगनदारीला आहे आणि दारूची दुकाने चांगल्या ठिकाणी आहेत हीच अशुद्ध परंपरा लावणाऱ्या पापी लोकांना हद्दपार केलं पाहिजे .मुलांना अभ्यासाला जाताना पिणाऱ्या लोकांच्या आणि सौच्यास जाणाऱ्या लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे .लायब्ररी मध्ये घाण वास येत असून ती गावाच्या मध्यावती जागेवर पाहिजे व बाकीची दुकाने बाहेर पाहिजेत पण गावात उलट घडत आहे.गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साठी एकही रुपयाचा निधी ग्रामपंचायत किंवा येथील चालू सरपंच ने दिला नाही.मग महापुरुषांच्या जयंती चा खर्च कुठे वापरला की तो पण घश्यात घातला याचाही हिशोब सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामसेवक यांना विचारला पाहिजे. गावातील सरपंच उपसरपंच सदस्य यांचं नियोजन शून्य असून योग्य निधी जमा करून हे काम तात्काळ करा. पोस्ट ऑफिस तत्काळ करून द्या, लायब्ररी ला आणि रीडिंग रूम ला गावाच्या हागणदारीतून मध्यावती जागेवर स्थलंतरित करा,गावातील आलेल्या जिमची रूम रिकामी करून त्याचे सर्व समान अद्यावत करून तेथे जिम चालू करा, सर्व महा पुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी योग्य सन्मानपूर्वक साजरी करा, नसता कायदेशीर मार्गाने आंदोलन सुरू करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा खालापूरी भूमिपुत्र डॉ जितीनदादा वंजारे यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या