28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

गेवराई तालुका संगणक परिचालक संघटनेकडून कांबळे परिवाराचे सांत्वन

गेवराई तालुका संगणक परिचालक संघटनेकडून कांबळे परिवाराचे सांत्वन

————–

४१ हजार रुपयांची केली आर्थिक मदत

————–

गेवराई:

गेवराई येथील सामाजिक कार्यकर्ते कडूदास कांबळे यांचे चिरंजीव संगणक परिचालक मयुर कांबळे यांचे रविवारी हदय विकाराने दुःखद निधन झाले. दरम्यान गेवराई तालुका संगणक परिचालक संघटनेकडून आर्थिक मदत देवून कांबळे परिवाराचे सांत्वन करण्यात आले.

 

गेवराई येथील संगणक परिचालक मयूर कांबळे यांचे शनिवार दि.२७ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने दु:खद निधन झाले. मयूरच्या जाण्याने कांबळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपला एक सहकारी म्हणून त्यांच्या कुटुंबीयास संगणक परिचालक संघटनेकडून रोख स्वरुपात ₹ ४१०००/- हजार रुपयांची मदत करण्यात आली. कांबळे यांच्या घरी कुटुंबीयांची भेट घेवून त्यांचे सांत्वन करण्यात आले. यावेळी संगणक परिचालक संघटनेचे तालुकाध्यक्ष शैलेश संत, सुखदेव शेंबडे, सचिन नाटकर, योगेश कांबळे, कृष्णा पवार, पुष्पाराम शिंदे, बंडू हाकाळे, नंदकुमार पौळ, वैजनाथ जाधव, जयराम गायकवाड, नारायण कागदे, विष्णू यादव यांच्या सह तालुक्यातील आदी संगणक परिचालक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या